Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री झायरा वसीमशी छेडछाड प्रकरणी आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

अभिनेत्री झायरा वसीमशी छेडछाड प्रकरणी आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई अभिनेत्री झायरा वसीमशी विमानामध्ये असभ्य वर्तन केल्या प्रकरणी आरोपी विकास सचदेव याला १३ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सचदेव याला पोलिसांनी रविवारी रात्रीच अटक केली होती. झायरा वसीम रविवारी नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तारा एअरलाइन्सने प्रवास करत असताना तिच्यासोबत एका सहप्रवाशानं असभ्य वर्तन केलं.

Vikas Sachdev

प्रवासी तीच्या सीटवर मानेजवळ आपला पाय टाकून झोपला होता. तसेच तो झायराला पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्नही करीत होता. या प्रकारामुळे झायरा घाबरुन गेली होती. हा प्रकार घडत असताना झायराने विमानाच्या क्रू मेंबर्सना याबाबत माहिती दिली. मात्र, त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. तीच्या मदतीला कोणीही धाऊन आले नाही, असा आरोपही तीने केला होता. आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवरुन ही माहिती दिली होती. यानंतर सर्वस्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments