Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजन११ वर्षे वयाने मोठी मनीषा बनणार त्याची आई

११ वर्षे वयाने मोठी मनीषा बनणार त्याची आई

Ranveer Kapoor, Manisha Koiralaबॉलिवूडचा मुन्नाभाई अभिनेता संजय दत्तच्या जीवनावरील ‘संजू’ या बहुप्रतिक्षित संजू या सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे.’मुन्नाभाई एमबीबीएस’,’लगे रहो मुन्नाभाई’ असे सुपरहिट सिनेमा देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून रसिकांमध्ये उत्सुकता होती.संजय दत्तच्या जीवनावरील या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर हा संजय दत्तची भूमिका साकारणार आहे.

सिनेमाच्या टीझरमध्ये संजय दत्तची आजवरील विविध रुपे दाखवण्यात आली आहेत.रणबीर कपूरने या सिनेमात हुबेहूब संजय दत्त साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.त्यामुळेच की काय टीझरमध्ये रणबीरने साकारलेला संजूबाबा भलताच भाव खाऊन जातो.या सिनेमात संजय दत्तच्या जीवनातील अनेक गोष्टी रसिकांसमोर येणार आहेत.टीझरमधूनही त्याचीच प्रचिती आलीय.संजय दत्तच्या खासगी जीवनातील रंजक गोष्टींचा उलगडा सिनेमातून होणार असला तरी टीझरमधून एका मोठ्या गोष्टीचा उलगडा झाला आहे. या टीझरमध्ये संजू साकारणारा रणबीर म्हणतो “३०८ गर्लफ्रेंड थी और एक एके 56 राइफल”. या डायलॉगवरुन संजय दत्तच्या खासगी जीवनात ३०८ गर्लफ्रेंड होत्या की काय असा प्रश्न रसिकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र संजय दत्तच्या या ३०८ गर्लफ्रेंड कोण, त्यांची नावं काय हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. संजय दत्तच्या खासगी जीवनात त्याचे नाव टीना मुनीम, माधुरी दीक्षित यांच्यासह जोडलं गेले. या को-स्टारसह त्याच्या अफेअरच्या चर्चा ब-याच रंगल्या होत्या. याशिवाय या सिनेमातील रंजक बाब म्हणजे यांत अभिनेत्री मनीषा कोईराला संजय दत्तच्या आईची म्हणजेच नर्गिस दत्त यांची भूमिका साकारणार आहे. संजय दत्तपेक्षा वयाने ११ वर्षे मोठी आणि कधी काळी सिनेमात संजयची नायिका बनलेल्या मनीषाला रसिक या सिनेमात त्याच्या आईच्या भूमिकेत पाहतील. याआधी संजय दत्त आणि मनीषा कोईराला यांनी सात सिनेमात एकत्र भूमिका साकारल्या आहेत. यांत सनम, काडतूस, बागी, खौफ, मेहबूबा अशा सिनेमात मनीषाने संजय दत्तच्या नायिकेची भूमिका साकारली होती.या भूमिकेसाठी तिची निवड होण्यामागचं खास कारण राजकुमार हिरानी यांनी सांगितलं आहे.संजय दत्त यांच्या आई नर्गिस दत्त या कॅन्सरने आजारी होत्या. त्यातच मनीषानेही कॅन्सरशी लढाई लढली आहे.त्यामुळे या भूमिकेला मनीषा उत्तमरित्या न्याय देऊ शकेल असा विश्वास हिरानी यांना होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments