Thursday, June 20, 2024
Homeमनोरंजननिया शर्माने लावले निळ्या रंगाचे लिपस्टिक ! लोकांनी म्हटले ‘पोर्नस्टार’!!

निया शर्माने लावले निळ्या रंगाचे लिपस्टिक ! लोकांनी म्हटले ‘पोर्नस्टार’!!

आशियातील तिसरी ‘सेक्सीस्ट वूमेन’ निया शर्मा सध्या चर्चेत आहे. खरे तर सोशल मीडियावर निया कायम चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो चाहत्यांना वेड लावतात. निया आपल्या लूक्ससोबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. पण कदाचित नियाचा असाच एक ताजा प्रयोग फसलायं. होय, काहींना नियाचा हा ताजा लूक जराही भावला नाही.
नियाने अलीकडे एक हॉट फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो नियाने सोशल मीडियावर पोस्ट केलेत. पण याच फोटोंमुळे नियाला ट्रोल व्हावे लागले. आता या फोटोशूटमध्ये असे काय होते तर नियाच्या लिपस्टिकचा रंग. होय, या फोटोत नियाने व्हाईट कलरचा शर्ट घातला आहे आणि ओठांवर ब्लू रंगाची लिपस्टिक लावलीय. नियाचा हा लूक आत्तापर्यंतचा सगळ्यांत हॉट आणि बोल्ड लूक आहे. पण अनेकांना तिचा हा लूक आवडला नाही आणि नाराज नेटिजन्सनी यावरून नियाला ट्रोल केले. ‘इतके मेकअप अजिबात आवडले नाही,’ असे एका ट्रोलरने लिहिले. काहींनी तर नियाला ‘बंदरीया’ आणि ‘पोर्न स्टार’ म्हणून बोलवले. अर्थात काहींनी नियाच्या या बोल्ड लूकची प्रशंसाही केली.

नियाचे म्हणाल तर तिला ट्रोलर्सच्या टीकेने काहीही फरक पडला नाही. कारण  या फोटोशूटनंतर निया याच गेटअपमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या पार्टीत  सामील झाली. विशेष म्हणजे यानंतर तिने ट्रोलर्सनाही सणसणीत थोबाडीत हाणली.

ट्रोलर्सच्या कमेंटनंतर तिने याच अवतारातला आणखी एक फोटो पोस्ट केला. शिवाय त्याला ‘Just the way you won’t like!’ असे कॅप्शन दिले. एकंदर काय तर ट्रोलर्सला जे काही सांगायचे ते नियाने या एकाच वाक्यात सांगितले.
तुम्हाला आठवत असेल तर अभिनेत्री ऐश्वर्या राय ही सुद्धा लिपस्टिकच्या रंगामुळे अशीच ट्रोल झाली होती. एका इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये ऐश्वर्याने पर्पल कलरचे लिपस्टिक लावले होते. यावर तिला बरेच काही ऐकावे लागले होते. पण निया व ऐश्वर्यासारख्या अभिनेत्रींना या प्रतिक्रियांची पर्वा नाहीच. ट्रोलर्सनेही हे वेळीच समजून घेतलेले बरे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments