Monday, August 17, 2026
Homeमनोरंजनबिग बॉसचा  ‘हा’ नवा प्रोमो

बिग बॉसचा  ‘हा’ नवा प्रोमो

मुंबई : बिग बॉस १३ ग्रँड फिनाला पुढच्या आठवड्यात होणार आहे. बिग बॉसचा एक नवा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मी देसाईला सिद्धार्थशी निगडीत काही प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न ऐकून घरातील इतर स्पर्धकांना धक्का बसतो.

हा प्रोमो व्हिडिओ बिग बॉस जासूस या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात एक प्रसिद्ध अँकर घरातील सदस्यांना अनेक प्रश्न विचारताना दिसतात. व्हिडिओत स्पष्ट दिसतं की, रश्मी देसाईला विचारलं जातं की, ‘सिद्धार्थशी तुझं फार जूनं नातं आहे?’ या प्रश्नाचं उत्तर देताना रश्मी म्हणते की, ‘खूप जूनं नातं आहे. हृदयापासून हृदयापर्यंत.’ यानंतर रश्मीला प्रश्न विचारला जातो की, ‘घरात येण्यापूर्वी अशी कोणती गोष्ट होती ज्याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं’ या प्रश्नाचं उत्तर देताना रश्मी म्हणाली की, ‘हा फार खासगी प्रश्न आहे.’

यावर अँकर म्हणतात की, ‘हीच ती वेळ आहे सर्व काही सांगण्याचं.’ रश्मीनंतर सिद्धार्थ शुक्लाला रश्मीशी निगडीत प्रश्न विचारले जातात. यावर सिद्धार्थ म्हणतो की, ‘रश्मी देसाईचा खोटारडेपणा मर्यादेपेक्षा जास्त आहे.’ तसेच सिद्धार्थ खेळात सर्वांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. यावर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणतो की, ‘मी या शोमध्ये सर्वांना प्रतिस्पर्धी मानतो. फक्त शहनाजला नाही.’

रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला घराच्या बाहेरील वाद बिग बॉसच्या घरात घेऊन आले. दोघांनी अनेकदा या सर्व गोष्टी विसरण्याचा प्रयत्नही केला. पण त्यात दोघांनाही फारसं यश आलं नाही. विशेष म्हणजे दोघांनी अजूनपर्यंत त्यांच्यात काय वाद झाला होता याचा खुलासा केलेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments