श्रीदेवी त्या काळात तिच्या जबरदस्त डान्ससाठी ओळखली जाते.‘मिस्टर इंडिया’तील ‘हवा हवाई’ असो किंवा ‘मेरे हाथों में नौ नौं चूडियां’मधील श्रीदेवी असो, तिच्या डान्सची चर्चा आजही होते. आता अशात तिच्यापुढे डान्स करताना बडे बडे नर्व्हस होणार नाहीत तर नवल. कॅटरिना कैफचेच घ्या ना. श्रीदेवीला पाहून कॅटरिना इतकी नर्व्हस झाली की डान्स करणेच विसरली. खुद्द कॅटने इन्स्टाग्रामवर याचा खुलासा केला आहे.
कॅटरिनाने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. यात ती एका डान्स स्टुडिओच्या फरशीवर बसलेली दिसतेय. या स्टुडिओमध्ये श्रीदेवीचे एक मोठे पोस्टर लागलेले आहे आणि श्रीदेवीचे हेच पोस्टर पाहून कॅटला नव्हर्स वाटतेय. ‘श्रीदेवी तुम्हाला डान्स करताना पाहत असेल तर नव्हर्स होणे साहजिक आहे…,’असे कॅप्शन कॅटने या फोटोला दिले आहे.
खरे तर कॅटरिना कैफ एक चांगली डान्सर आहे. ‘शीला की जवानी’,‘चिकनी चमेली,’‘काला चश्मा’ हे कॅटचे डान्स नंबर्स बरेच फेमस झाले होते. अलीकडे रिलीज झालेल्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातही ती अगदी हटके डान्स मुव्ज करताना दिसली होती. पण तरिही श्रीदेवीच्या पोस्टरने कॅट नव्हर्स होत असेल तर तो तिचा मोठेपणा म्हणायला हवा. श्रीदेवी एक महान अभिनेत्री आहे आणि या महान अभिनेत्रीपुढे कॅटरिना स्वत:हून नतमस्तक होते आहे, यातच सगळे आले. कॅटने शेअर केलेला हा फोटो आणि त्याचे कॅप्शन तिचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे.
तूर्तास कॅटरिना ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘टायगर जिंदा हैनंतर कॅटरिना शाहरुखान आणि अनुष्का शमार्सोबत आनंद एल राय यांच्या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटातही तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यात ती आमिर खानसोबत दिसणार आहे. याशिवाय १९८३ मध्ये भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्डकप मिळवून देणा-या टीमवर आधारित चित्रपटातही कॅटरिनाची वर्णी लागल्याची खबर आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे आणि रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे.