
नेहा कक्कर तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच नेहाने तिच्या आजारपणाविषयी एक खुलासा केला आहे. हा खुलासा करत असताना ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
नेहा सध्या ‘इंडियन आयडॉल १२’च्या परीक्षक पदाची जबाबदारी पार पाडत असून याच मंचावर तिने तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे. लवकरच या शोमध्ये आईवर आधारित खास भाग होणार आहे. यात नेहा तिच्या आजारपणाविषयी सांगताना दिसत आहे.
नेहाला एंग्जाइटी इश्यू असून याविषयी बोलताना ती भावूक झाली. चंदीगढमधून आलेल्या अनुष्काने ‘लुका छुपी’ हे गाणं सादर केलं. तिचं हे गाणं ऐकताना नेहा भावूक झाली. यावेळी नेहाने तिला एंक्झायटीचा त्रास असल्याचं सांगितलं.
दरम्यान, नेहा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. अनेकदा नेहा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेदेखील चर्चेत असते. अलिकडेच नेहाने रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा विवाहसोहळा हा कलाविश्वात चांगलाच चर्चेत राहिला होता.