मुंबई: अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं. ‘तिला जगू द्या’ या गाण्यापासूनच अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याची उत्सुकता होती. अखेर हे गाणं रिलीज झालं असून, अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी नवीन गाणं प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर नव्या गाण्याबद्दल चर्चा रंगत होती. महिला दिनी ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणं रिलीज झालं. त्यावर रोहित पवार यांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा! https://t.co/aPiF9xBMWL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 9, 2021
“काही लोकांना सहज, तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता, त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोकणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करून गाणं रिलीज झाल्याची माहिती दिली होती.