Tuesday, December 3, 2024
Homeमनोरंजनराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : ‘तेरी मिट्टी मे मिलजावा’ गाण्याची छाप

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : ‘तेरी मिट्टी मे मिलजावा’ गाण्याची छाप

national-film-awards-2019-best-male-playback-singer-b-praak-for-the-song-teri-mitti-from-kesari-news-updates
national-film-awards-2019-best-male-playback-singer-b-praak-for-the-song-teri-mitti-from-kesari-news-updates

दिल्ली: आज दिल्लीमध्ये ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली. २०१९ सालांमधील कलाकृतींसाठीच्या पुरस्कारांची घोषणा  कऱण्यात आली. या पुरस्कारांची घोषणा मागील वर्षी मे महिन्यामध्ये होणं अपेक्षित होतं मात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कारांची घोषणा पुढे ढकलली होती. अखेर आज दिल्लीमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून  कंगना रणौतला तर सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मनोज बाजपेयी आणि धानुषला विभागून देण्यात आलाय. याचबरोबर अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी मे मिलजावा’ या गाण्यासाठी बी पारक यांना सर्वोत्तम गायक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय.

१५ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राची प्रमुख भूमिका असणाऱ्या केसरी चित्रपटामधील ‘तेरी मिट्टी मे मिलजावा’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. मनोज मुन्ताशीर यांनी लिहिलेलं हे गाणं आर्को पर्वो मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलं आहे. युद्धभूमीवर शेवटचे श्वास मोजत असणाऱ्या योद्ध्याने आपल्या मातृभूमीला उद्देशून गायलेलं हे गाणं चित्रपटाच्या शेवट्याच्या टप्प्यात पहायला मिळतं.

The award for the best male playback singer goes to B Praak for the song ‘Teri Mitti’ from Hindi film ‘Kesari’.

— ANI (@ANI) March 22, 2021

करोना कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना सलाम करण्यासाठी या गाण्याच्या आधारावरच नवीन शब्दांसहीत एक व्हिडीओ तयार करुन मागील वर्षी एप्रिलमध्ये गाण्याची निर्मिती करणाऱ्या झी म्युझिकडून पोस्ट करण्यात आला होता. झीने खास डॉक्टरांसाठी याच गाण्याच्या चालीवर एक खास कडवं लिहून त्यांना सलाम केलेला. डॉक्टरांवर हल्ले होत असतानाही ते धैर्याने रुग्णांवर उपचार करत असल्याचे कौतुक या व्हिडिओमधून करताना एक खास कडवं लिहिलं होतं. ते पुढील प्रमाणे…

“मजबूर हुई जब दिल की दुवा तो हमने दवा से काम लिया…
वो नब्ज नहीं हमने थमने दी जीस नब्ज को हमने थाम लिया…
बिमार है जो किस धर्म का है…
हमसे ना कभी ये भेद हुआ…
सरहद पे जो वर्दी खाकी थी
अब उसका रंग सफेद हुआ…”

यामधून डॉक्टरांनी उपचार करताना कधीच रुग्णाचा धर्म पाहिला नाही, त्यांनी ज्या रुग्णाला आधार दिला त्याला बरं केलं. तसेच आज डॉक्टरच खऱे सैनिक असून ते पांढऱ्या कपड्यांमध्ये देशाचे संरक्षण करत आहेत, असा संदेश या गाण्यामधून देण्यात आला होता. २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या गाण्याला सर्वोत्तम गाणं म्हणून नामांकन मिळालं होतं. मात्र यावेळी ‘गली बॉय’मधील ‘अपना टाइम आऐगा’ या गाण्याला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर मनोज मुन्ताशीर यांनी ट्विटरवरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments