Sunday, September 15, 2024
Homeमनोरंजनआता अशी दिसते मिनाक्षी शेषाद्री

आता अशी दिसते मिनाक्षी शेषाद्री

आपल्या सिनेकरिअरमध्ये ‘हीरो’, ‘घायल’, ‘दामिनी’, ‘घातक’, ‘शहेनशहा’, ‘तूफान’, ‘दिलवाला’, ‘आंधी-तूफान’ अशा एकाहून एक हिट सिनेमांत काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीला तुम्ही आता भेटलात तर कदाचित तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून मिनाक्षी बॉलिवूडपासून दूर राहिली आहे. पण सध्या तिने सोशल मीडियावर आपले नुकतेच काढलेले फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंमध्ये वयामुळे तिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसत आहे. पण असे असले तरी ती आजही सुंदर दिसते. ती आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगत आहे.

मिनाक्षी भरतनाट्यम, कुचिपुडी, कत्थक आणि ओडिसी या शास्त्रीय नृत्यात पारंतग आहे. मिनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टी सोडली होती. सध्या मिनाक्षी टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ ही संस्था चालवते. या संस्थेद्वारे ती विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य शिकवते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments