मुंबई । जुन्या जमान्यातील मराठी आणि हिंदी गाणी ऐकायची आवड असलेल्या असंख्य चाहत्यांसाठी ‘महक-ए-झीनत’ हा लाईव्ह संगीताचा कार्यक्रम महक क्रिएशन्सच्या वतीने येत्या शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात रात्री पावणेनऊ वाजता रंगणार आहे. संजीवनी भेलांडे आणि प्रशांत नासेरी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, वहिदा रेहमान, वैजयंती माला, पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर, मराठीतील राहुल देशपांडे, आनंद भट यांच्यासोबत कॉमेडी किंग जॉनी लिव्हर, पंकज उधास हेही उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे १९७०-८० या दशकांमध्ये गाजलेली अभिनेत्री झीनत अमान ही यावेळी प्रमुख पाहुणी म्हणून असेल. तिने १९७० साली मिस एशिया पॅसिफिक ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. महक क्रिएशनने या वर्षी ६५ वर्षे पूर्ण केली आहेत.