Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनट्विटरवरही 'किंग'खानचा बोलबाला

ट्विटरवरही ‘किंग’खानचा बोलबाला

Shahrukh Khan
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, केवळ सिनेसृष्टीपुरतीच मर्यादीत नसून सोशल मीडियावरही त्याचाच बोलबाला आहे. बॉलीवूडनंतर त्याने सोशल मीडियावरही आपले साम्राज्य निर्माण केले आहे. त्याच्या ट्विटर फॉलोअर्सची एकूण संख्या ३९ मिलियन म्हणजेच ३ कोटी ९० लाख इतकी झाली आहे.

शाहरुख सोशल मीडियावर मात्र नेहमी अॅक्टीव्ह असतो. चाहत्याच्या संपर्कात राहिल्यानं त्याच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. तसंच अनेकदा चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही शाहरुख प्रेमानं उत्तर देताना दिसतो. ३९ मिलियनफॉलोअर्स झाल्यानंतर त्यानं चाहत्यांचे आभार मानले आहेत. आणि प्रेम असंच देत राहा अशी प्रेमळ विनंतीही केली. ‘असंच प्रेम करत रहा. स्वत:ला आनंदी ठेवा, लव्ह यू ऑल’ असं म्हणत शाहरुखनं चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे सध्या शाहरूखच्या लोकप्रियतेचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments