Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनकिम कार्दशियनने बंगला विकून कमावला ५७ कोटी रुपये नफा

किम कार्दशियनने बंगला विकून कमावला ५७ कोटी रुपये नफा

अॅक्ट्रेस किम कार्दशियन हिने तिचा बेल एअर मेन्शन ११५ कोटी रुपयांमध्ये विक्री केला आहे. तिने हे मेन्शन २०१३ मध्ये जवळपास ५८ कोटींमध्ये खरेदी केले होते. म्हणजे किमला जवळपास ५७ कोटी रुपये फायदा झाला आहे. हा बंगला सिलिकॉन व्हॅली येथे राहाणारे मॅरिना अक्टॉन याने खरेदी केला आहे. मॅरिना सध्या म्यूझिकमध्ये करिअर आजमावत आहे.

बंगल्याच्या रिनोवेशनवर १३ कोटी खर्च केले

किम आणि तिचा पती केन्ये वेस्ट याने या २०१३ मध्ये बंगल्याच्या रिनोवेशनवर १३ कोटी खर्च केले होते.१०,००० स्केअर फूट परिसरात पसरलेल्या या बंगल्यात सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत. हा बंगला डबल स्टोअर आहे. यामध्ये एलवेटर, बास्केट बॉल कोर्ट, खेळती हवा आणि मेकअप सलून आहे. याशिवाय वाइन सेलर, पूल, टेनिस कोर्ट, स्पा, आऊटडोअर पॅव्हेलियन आणि एटंरटेनिंग एरिया आहे. त्यासोबतच बंगल्याच्या परिसरात हॉट वॉटर टब आहे. बंगल्यात ड्रायव्हिंग एरिया देखील आहे आणि हरिव्या झाडीने बंगला सजलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments