skip to content
Tuesday, May 21, 2024
Homeमनोरंजनश्रीदेवीची खुशी ‘मॉडेलिंग’ क्षेत्रात जाणार!

श्रीदेवीची खुशी ‘मॉडेलिंग’ क्षेत्रात जाणार!

khushiसुपरस्टार श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवीने बॉलिवूडचा मार्ग स्विकारला असला तरी छोटी मुलगी खुशी कोणत्या क्षेत्रात करिअर करणार याबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र खुशीने देखील तिच्या आवडीचे क्षेत्र निवडले असून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉडेलिंग करायची आहे.

कपूर कुटुंबात नुकतेच सर्वजण एकत्र भेटले होते. त्यावेळी खुशीने आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉडेलिंग करण्याची इच्छा असल्याचे जाहीर केले. १७ वर्षांची खुशीचे सर्व लक्ष सध्या शिक्षणावर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग विश्वात पदार्पण करणार आहे. मॉडेलिंग क्षेत्रातील रितसर शिक्षण घेण्यासाठी खुशी परदेशात जाणार आहे.

श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर ही करण जोहरचा आगामी चित्रपट धडक मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहीद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. धडक हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपट सैराटचा रिमेक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments