Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनचित्रपटासाठी एका आठवड्यापासून भरतनाट्यम शिकत आहे हि अभिनेत्री

चित्रपटासाठी एका आठवड्यापासून भरतनाट्यम शिकत आहे हि अभिनेत्री

कंगनाचे 'थलायवी' साठी भरतनाट्यमचे धडे; 100 डान्सर्ससोबत रेट्रो सॉन्ग

मुंबई: कंगना राणावत आपल्या चित्रपटात परफेक्शन आणण्यासाठी खूप मेहनत करते. सध्या कंगना जयललिता यांच्या बायोपिकची तयारी करत आहे. ज्याचे टायटल हिंदी मध्ये ‘जया’ आणि तमिळमध्ये ‘थलायवी’ आहे. चित्रपटात कंगना 100 डान्सर्ससोबत एक रेट्रो सॉन्ग शूट करणार आहे, जे साउथ सिनेमाची कोरियोग्राफर गायत्री रघुराम दिग्दर्शित करणार आहे.

एका आठवड्यापासून शिकत आहे भरतनाट्यम

या डान्स सीक्वेंससाठी मागच्या एका आठवड्यापासून कंगना नियमितपणे भरतनाट्यम क्लासमध्ये जाताना दिसत आहे. लोक या चित्रपटासाठी खूपच उत्साहित आहेत कारण जयललिता नेत्या बनण्यापूर्वी एक अभिनेत्री होत्या.

इंस्टाग्रामवर माहिती केली शेअर

कंगनाचे इंस्टाग्राम अकाउंट टीम कंगना राणावत यावर ही माहिती शेअर केली गेली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करत आहे आणि याचे लेखन ‘बाहुबली’ आणि ‘मणिकर्णिका’ लेखक केवी विजय प्रसाद आणि ‘डर्टी पिक्चर’ यांसारख्या चित्रपटांचे रायटर रजत अरोरा यांनी मिळून केले आहे. कंगना याव्यतिरिक्त अश्विनी अय्यर तिवारीचा चित्रपट ‘पंगा’ मध्येदेखील दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments