अभिनेत्री कल्की कोचलीन आणि ऋचा चढ्ढा यांचा ‘जिया और जिया’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. सध्या या दोन्ही अभिनेत्री चित्रपटाला प्रमोट करण्यात व्यस्त आहेत. या दोघींनी एका वेबसाइटला मुलाखत दिली असता, कल्कीने बिनधास्तपणे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. कल्कीला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, ‘तुला मुलांचे कोणते तीन अवयव सर्वात आवडतात?’ यावर उत्तर देताना कल्कीने म्हटले की, ‘त्यांचे पियर्सिंग, आयब्रो आणि आइज मला खूप आवडतात.
तर ऋचाला विचारण्यात आले की, जेव्हा तिला खूप भूख लागते आणि रागही येतो तेव्हा तिला कोणत्या तीन गोष्टी हव्या असतात? यावर ऋचा उत्तर देते की, ‘त्यावेळी मला फ्रूट्स, दाळ आणि भात हवा असतो.’ दरम्यान, कल्की आणि ऋचाचा हा अतिशय हटके असा चित्रपट आहे. यास तुम्ही रोड मुव्ही असेही म्हणू शकता. मात्र यामध्ये रस्त्यावर जेवढी यात्रा दाखविण्यात आली आहे, त्यापेक्षा अधिक आतमध्ये दाखविण्यात आली आहे. चित्रपटात दाखविण्यात आले की, लोक कधीना कधी बदलतात अन् एकत्र चालायला लागतात.
चित्रपटात ऋचा आणि कल्की दोघींचेही नाव जिया आहे. मात्र या दोन्ही जिया एकमेकींच्या तुलनेत अगदी वेगळ्या आहेत. एक जिया जीवन आणि स्वत:विषयी हताश आहे. मात्र अशातही ती चेहºयावर हसू ठेवण्याचे नाटक करते, तर दुसरी जिया खूपच अल्लड आहे. तिला आयुष्य जगायचे असते. दरम्यान, कल्कीच्या या तरुणांविषयीच्या आवडी सध्या चर्चेचा विषय ठरत असून, सोशल मीडिंयावर याविषयीची चांगलीच चर्चा रंगत आहे.