Friday, December 6, 2024
Homeमनोरंजनसलमानच्या ‘राधे’ला जॉनची टक्कर, ‘सत्यमेव जयते-2’ ईदला होणार रिलीज

सलमानच्या ‘राधे’ला जॉनची टक्कर, ‘सत्यमेव जयते-2’ ईदला होणार रिलीज

john-abraham-satyamev-jayte-releasing-on-eid-with-salman-khan-radhe-news-updates
john-abraham-satyamev-jayte-releasing-on-eid-with-salman-khan-radhe-news-updates

जॉन अब्राहमचा येत्या 19 मार्चला ‘मुंबई सागा’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यातच जॉनच्या आगामी ‘सत्यमेव जयते-2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

येत्या ईदला म्हणजेच 13 मे या दिवशी जॉनचा ‘सत्यमेव जयते-2’  हा सिनेमा चित्रपटगृहात धडकरणार आहे. सलमान खानचा ‘राधे’ हा सिनेमादेखील ईदलाच रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘सत्यमेव जयते-2’ आणि ‘राधे’ यांची बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळेल.  दोनही सिनेमा हे दमदार अ‍ॅक्शन पॅक असल्याने प्रेक्षक कोणत्या सिनेमाला अधिक पसंती देणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

जॉन अब्राहमने त्याच्या इन्स्टाग्रामवर सिनेमाचं नवं पोस्टर शेअर केलंय़. या पोस्टरमध्ये जॉनचा डबलरोल पाहायला मिळतोय. ” या ईदला सत्या आणि जय मध्ये होणार टक्कर.. भारत मातेसाठी यावर्षी तिचे दोन्ही पुत्र लढतील.” अशा आशयाचं कॅप्शन जॉनने या पोस्टरला दिलंय. या सिनेमात ज़ॉन एका भूमिकेत पोलीस ऑफिसरच्या रुपात झळकणार असल्याचं पोस्टरमध्ये दिसतंय.

गेल्या काही वर्षांमध्ये फक्त सलमान खानचे सिनेमा ईदला प्रदर्शित होत असल्याचं लक्षात येतं. मात्र यंदा सलमानला टक्कर देण्यासाठी जॉनचा दमदार अ‍ॅक्शन सिनेमादेखील प्रदर्शित होतोय.

सलमान खानने देखील काही दिवसांपूर्वीच ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.सलमान खानने हे पोस्टर शेअर करत चाहत्यांसाठी एक कॅप्शन दिलं होतं. ” ईदची कमिटमेन्ट दिली होती. ईदलाच येणार क्यू की एक बार जो मैने…” असं खास कॅप्शन त्यानं दिलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments