Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeदेशसलमानची आजची रात्रही तुरुंगातच!

सलमानची आजची रात्रही तुरुंगातच!

salman Khan, jodhpur jailमहत्वाचे…
१. जामिनावर शनिवारी ७ मार्च रोजी सुनावणी होणार
२. सलमानचे वकील महेश बोरा यांना धमकीचे फोन
३. प्रत्यक्षदर्शींच्या पुराव्यांवर विश्वास नसल्याचं सलमानच्या वकिलांच म्हणणं


जोधपूर- काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरविलेल्या अभिनेता सलमान खानला आजची शुक्रवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमान खानच्या जामिनावर शनिवारी ७ मार्च रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुनावणी होणार आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला असून उद्या त्यावर सुनावणी केली जाईल.

अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी जोधपूर कोर्टात युक्तीवाद झाला. यावेळी सलमानच्या वकिलांनी शिकारीच्या वेळी वापरल्या गेलेल्या जीपबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच प्रत्यक्षदर्शींच्या पुराव्यांवर विश्वास नसल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. दरम्यान, आता अभिनेता सोहेल खान व अरबाज खान जोधपूरला जाणार असल्याचं समजतं आहे.  सलमानची केस सोडण्यासाठी मला धमकीचे कॉल आले. फोनवरून जीवे मारण्याची धमकी आली असं सलमानचे वकील महेश बोरा यांची सांगितलं.

१९९८ च्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याची रवानगी जोधपूरच्या तुरुंगात करण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खानला तुरुंगातील कैदी नंबर १०६ देण्यात आला असून बराक क्र. २ मध्ये ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, जोधपूर तुरुंगाचे डीआयजी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला जेलमध्ये कैदी नंबर १०६ देण्यात आला आहे. त्याला तुरुंगातील ड्रेस उद्या देण्यात येणार आहे. तसेच, सलमान खाने तुरुंगातले जेवण नाकारले आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे, असेही ते म्हणाले. आलिशान लाइफस्टाइलची सवय असलेल्या सलमानला रात्र जमिनीवर झोपून काढावी लागली.

सलमानच्या वकिलाला धमकी: सलमानचा खटला सोडा, नाही तर गोळ्या घालू

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. या निकालानंतर आपल्याला धमकीचे एसएमएस आणि कॉल येत असल्याचे सलमानचे वकील महेश बोरा यांनी म्हटले आहे. सलमान खानचा खटला सोडण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचेही बोरा यांनी म्हटले.
सलमान खानला गुरुवारी जोधपूरच्या न्यायालयाने पाच वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. सलमानला जामीन मिळू न शकल्याने त्याला एक रात्र तुरुंगातच काढावी लागली. आजच्या सुनावणीसाठी न्यायालय परिसरात पोहोचल्यावर सलमानच्या वकिलांनी त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. ‘काल मला धमक्यांचे एसएमएस आले. इंटरनेट कॉल करुनही धमक्या देण्यात आल्या. सलमानचा खटला सोडून देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे,’ असे वकील महेश बोरा यांनी सांगितले. ‘सलमानची बाजू मांडणे सोडून द्या. अन्यथा गोळ्या घालू,’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे बोरा म्हणाले. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या सलमान जोधपूरच्या तुरुंगात आहे. सलमानला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असली, तरी या खटल्यातून अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम कोठारी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments