Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजनजान्हवी कपूर वाढवत आहे वजन, या फिटनेस ट्रेनरच्या मदतीने तयार होत आहे...

जान्हवी कपूर वाढवत आहे वजन, या फिटनेस ट्रेनरच्या मदतीने तयार होत आहे ‘धडक’साठी

जान्हवी कपूर धडकमधून डेब्यू करत आहे. या फिल्मच्या घोषणेपासूनच जान्हवी चर्चेत आली आहे. आता या फिल्मसाठी जान्हवी तिच्या फिगरवर काम करत आहे. धडकमराठी ब्लॉकबस्टर सैराटचा हिंदी रिमेक आहे. सैराटमधील अर्चीची भूमिका धडकमध्ये जान्हवी साकारणार आहे. स्क्रिप्टच्या डिमांडनुसार जान्हवीला आता तिचे वजन वाढवायचे आहे. यासाठी ती फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाची मदत घेत आहे.

यास्मिनने सांगितले, की ‘धडक’मध्ये जान्हवी गावातील मुलीची भूमिका साकारत आहे. ही मुलगी मजबूत बांध्याची आहे. स्क्रिप्टचीही तशीच डिमांड आहे. त्यामुळे जान्हवीला आपल्या भूमिकेसाठी सध्या योग्य डाएट आणि एक्सरसाइजची आवश्यकता आहे, त्यावरच लक्ष केंद्रीत केले आहे.  यास्मिन म्हणाली, ‘आम्ही तिच्या बॉडीवेटवर काम करत आहोत. जेणे करुन ती तिच्या कॅरेक्टरसाठी परफेक्ट दिसेल.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments