Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनअभिनेता जितेन्द्र यांच्या विरोधात ४७ वर्षे जुन्या लैंगिक शोषणप्रकरणी गुन्हा दाखल

अभिनेता जितेन्द्र यांच्या विरोधात ४७ वर्षे जुन्या लैंगिक शोषणप्रकरणी गुन्हा दाखल

jitendra४७ वर्षे जुन्या  लैंगिक शोषण प्रकरणी बॉलिवूड अभिनेते जितेन्द्र यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  जितेन्द्र यांची चुलत बहीण असल्याचा दावा करणा-या पीडित महिलेच्या तक्रारीनंतर हिमाचल प्रदेशातील न्यू शिमला ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. १९७१ मध्ये  अभिनेते जितेंद्र यांनी आपले लैंगिक शोषण केले होते, असा पीडित महिलेचा आरोप आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिस  संबंधित महिलेच्या सतत संपर्कात आहेत. शिमल्यात येऊन मॅजिस्ट्रेटसमक्ष जबाब नोंदवण्याची तयारी तिने दर्शवली आहे.

हे आहे प्रकरण
७ फेबु्रवारीला हिमाचल डीजीपी  ऑफिसला कथित पीडित महिलेने एक ऑनलाईन तक्रार पाठवली होती. यात तिने जितेन्द्र यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ‘ही घटना  ४७ वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी माझे वय १८ वर्ष होते. तर जितेंद्रचे वय २८ वर्ष होते. जानेवारी १९७१ मध्ये एकेदिवशी  माझा चुलत भाऊ जितेंद्र माझ्या दिल्लीस्थित घरी आला.  तेथून शूटींग दाखवण्याच्या बहाण्याने तो मला कारने शिमला येथे  सेटवर घेऊन गेला. जितेंद्र माझा चुलत भाऊ असल्याने माझ्या घरच्यांनीही सहज परवानगी दिली. शिमल्यात जितेंन्द्र  मला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्याने नशेत माझे लैंगिक शौषण केले. या घटनेनंतर इतकी वर्षे केवळ माझ्या आई वडिलांमुळे मी शांत होते. परंतु आई-वडिलांच्या निधनानंतर मी याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला.  माझ्या आई-वडिलांना  हयात असताना ही घटना समजली असती, तर त्यांना प्रचंड धक्का बसला असता. त्यामुळे मी  इतकी वर्षे प्रचंड मानसिक यातना सहन केल्या. पण  गेल्या काही दिवसांपासून जगभरात राबवल्या जात असलेल्या #MeToo या  अभियानाने मला धीर आला आणि मी याविरोधात आवाज उठवायचा निर्णय घेतला, असे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

जितेंद्रच्या वकीलांनी फेटाळला आरोप
जितेन्द्र यांचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी संबंधित महिलेचे आरोप निराधार ठरवले होते. जवळपास ५० वर्षे जुन्या आणि निरर्थक आरोपांना कुठलाही कायदा दाद देणार नाही. कायद्यानुसार कुठलीही तक्रार तीन वर्षांच्या आत करायची असते. जेणेकरून आरोपानुसार तपास करता येईल. जितेंद्र यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments