आता लवकरच ‘रेस-3’ आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. यात सलमान खान मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा केली आहे. हे जाहीर झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमधला उत्साह चांगलाच वाढला आहे. या सिनेमासाठी इतर कलाकारांची नावंही घोषित करण्यात आली आहे. सलमान खान सोबत जॅकलीन फर्नांडिसचा जलवा आपल्याला पहायला मिळणार आहे. बॉबी देओल आणि डेजी शहा, साकिब झळकणार आहेत. यात अजून अनेक मोठे कलाकार प्रेक्षकांना दिसण्याची शक्यता आहे.
रेस सिनेमाच्या तिसऱ्या पार्टमध्ये बॉबी देओल आणि डेजी शहाही झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार असून सुप्रसिद्ध निर्माता रमेश तोरानी यांची निर्मिती आहे. २०१८ च्या ईदपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. ‘हवा हवाई’ या सिनेमातील साकिब सलीमही रेस-3 मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. साकिब या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारणार आहे. रेस सिनेमांच्या मालिकेतील पहिला रेस सिनेमा २००८ मध्ये प्रदर्शित झाला. रहस्य आणि थरार यांनी भरलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला होता. या सिनेमात सैफ अली खान, अक्षय खन्ना आणि बिपाशा बासू मुख्य भूमिकेत होते. यानंतरचा रेस-2 २०१३ मध्ये बॉक्स ऑफिसवर आला पण पहिल्या रेस सिनेमासारखी पसंती रेस-2 ला मिळाली नाही. आता रेस-3 ला लोक किती प्रतिसाद हे बघणं उत्सुकतेचं आहे. या सिनेमाची स्टार कास्ट जबरदस्त असल्याने आता चाहत्यांची अपेक्षाही वाढली आहे. आता हा सलमानचा सिनेमा त्याच्या चाहत्यांवर किती जादू करणार ते पुढच्या वर्षीच्या ईदलाच कळेल.