Sunday, January 26, 2025
Homeमनोरंजन'बागी 2'मध्ये टायगर श्रॉफ गर्लफ्रेंड दिशा पटानीसह मुख्य भूमिकेत

‘बागी 2’मध्ये टायगर श्रॉफ गर्लफ्रेंड दिशा पटानीसह मुख्य भूमिकेत

चाहत्यांच्या मनावर जादू करणारा टायगर श्रॉफ सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘बागी 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच शूटिंग दरम्यान सिनेमाच्या सेटवरचा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात टायगर त्याच्यासोबत क्रू मेंबर्स आणि बॉडीगार्ड दिसत आहेत. मात्र या चित्रपटात तो त्याची गर्लफेंड दिशा पटानीसह झळकणार आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांनाही काही दिवस वाट बघावी लागणार आहे.

हा फोटो टायगरच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये टायगरच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसतायत आणि त्याच्या चेहऱ्यावर राग दिसतोय.असं सांगितलं जातं की या सिनेमासाठी टायगर श्रॉफने 5 किलो वजन वाढवलं आहे. या फोटोमध्ये टायगर श्रॉफ खूपच रुबाबदार दिसतोय. त्याचबरोबर नवीन हेअरस्टाईलमध्ये टायगर आणखीनच चमकत आहे. या सिनेमाची चाहत्यांना खास उत्सुकता असणार आहे कारण यात टायगरसोबत त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानीसुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

थायलंड, हाँगकाँग, चीन यासारख्या ठिकाणी ‘बागी 2’चं शूटिंग सुरू आहे. अॅक्शन आणि रोमान्स असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन साजिद नाडियादवाला यांनी केलं आहे. हा सिनेमा २७ एप्रिल २०१८ ला रिलीज होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments