Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशस्वत:ला हिंदू म्हणवणाऱ्यांची लाज वाटतेय; कठुआ सेलिब्रिटी भडकले

स्वत:ला हिंदू म्हणवणाऱ्यांची लाज वाटतेय; कठुआ सेलिब्रिटी भडकले

sonam kapoorमहत्वाचे…
१. जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट
२. टेनिसपटू सानिया मिर्झाने याप्रकरणी ट्विट
३. ‘स्वत:ला हिंदू आणि या देशाचे नागरिक म्हणवणाऱ्यांची लाज वाटते


जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कठुआमधील आठ वर्षांच्या चिमुरडीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना समोर आली. या प्रकारानंतर सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील बलात्कार,हत्या प्रकरणाची घटना १७ जानेवारी रोजी समोर आल होती. या प्रकरणात सोमवारी पोलिसांनी आठव्या आरोपीविरोधातही आरोपपत्र दाखल केले. या घटनेची वाच्यता झाल्यानंतर सर्वच माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.  टेनिसपटू सानिया मिर्झाने याप्रकरणी ट्विट केलं. ‘जगभरात आपल्या देशाची ओळख अशाप्रकारे निर्माण व्हावी असं आपण इच्छितो का? आपला धर्म, लिंग, जात, वर्ण या गोष्टी बाजूला सारून जर आपण या घटनेविरोधात उभं राहू शकत नाही तर या जगात आपल्या अस्तित्वाला काहीच महत्त्व राहणार नाही, माणुसकीलाही नाही,’ अशा शब्दांत सानियाने तिचा राग व्यक्त केला. तर अभिनेत्री सोनम कपूरनेही जळजळीत शब्दांत टीका केली. ‘स्वत:ला हिंदू आणि या देशाचे नागरिक म्हणवणाऱ्यांची लाज वाटते. माझ्या देशात अशा घटना घडत आहेत हे पाहून मला विश्वासच बसत नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया तिने दिली.

फरहान अख्तर, रितेश देशमुख, रेणुका शहाणे यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर या घटनेविषयी तीव्र राग व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments