हिमेश रेशमिया हि बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर आणि संगीतकार आहे. गेल्या वर्षी हिमेशने आपले २२ वर्षांचे नातं संपवले. हिमेशने त्याची पत्नी कोमलसोबत घटस्फोट घेतला. हिमेशचे लग्न तुटण्या मागचे कारण त्याची गर्लफ्रेंड टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर असल्याची चर्चा आहे. स्पॉटब्वॉयच्या रिपोर्टनुसार पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर सध्या गर्लफ्रेंड सोनियासोबत एकाच घरात राहतो आहे. दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा होती. एक इव्हेंट दरम्यान हिमेशला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तू लवकरच दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहेस का ? यावर हिमेशने नाही असे उत्तर दिले.
या प्रश्नने हिमेशला थोडेसे कात्रीत नक्कीच टाकले. हिमेशच्या जवळच्या सूत्रांनी स्पॉट ब्वॉयला दिलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान सांगितले हिमेशचा कोमलसोबत घटस्फोट होण्याआधीपासून आपल्या मैत्रिणीसोबत राहतो. ऐवढेच नाही तर लाईव्ह शो दरम्यान सोनिया तिच्यासोबत असते. हिमेशचा मुलगा स्वयमला ही सोनिया आवडत असल्याची चर्चा आहे. घटस्फोटानंतर हिमेश म्हणाला होता की,‘पती-पत्नीमध्ये ऐकमेकांविषयी आदर असणे अत्यंत महत्त्वाचे असते. एवढ्या वर्षांच्या नात्याचा मान राखत आम्ही सौहार्दपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम २००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे अफेयर चर्चेत आले होते. पहिले चार वर्षे तर हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रिण’ अशीच सांगितली. परंतु दोघांची वाढती सलगी मीडियापासून लपून राहिली नाही. कुटुंबियांच्या विरोधामुळे मग काही काळासाठी दोघांनी एकमेकांपासून अंतर राखून ठेवले. परंतु हिमेशच्या वडीलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले. सुत्रांनुसार, कोमलला याची पूर्ण कल्पना होती. तरीपण तिने कधीच त्याला उघडपणे विरोध केला नाही. नुकताच हिमेश सारेगमपा या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत दिसला होता. हिमेशने करिअरची सुरुवात सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या चित्रपटातून केली होती. २००३ मध्ये हिमेश तेरे नाम चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे प्रकाश झोतात आला. आशिक चित्रपटातून त्यांने गायला सुरुवात केली.