Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजन"सुपर ३०" हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत

“सुपर ३०” हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत

बिहारमधील प्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंदकुमार यांच्या कार्यावर आधारित “सुपर ३०” या हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

श्री. आनंदकुमार यांनी “रामानुजन स्कुल ऑफ मॅथेमेटिक्स्”च्या माध्यमातून बिहारमधील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांना जे.ई.ई. व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. त्यांचे अनेक विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या कार्यावर आधारित सुपर ३० हा हिंदी चित्रपट अलीकडे प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटातून आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश मिळू शकते, असा संदेश दिलेला आहे.

या चित्रपटातील सामाजिक संदेश सर्व समाजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील राज्य वस्तू व सेवा कराची (एसजीएसटी) सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार प्रेक्षकांकडून एसजीएसटी वसूल न करता, चित्रपटगृहाकडून भरणा करुन घेण्यात येणार आहे. त्यांनतर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीतील तिकीट विक्रीवर भरणा झालेल्या एसजीएसटीचा परतावा शासन निर्णयातील तरतुदींनुसार चित्रपटगृहांना दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments