Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजनआमिर खानची मुलगी इराचा बॉयफ्रेंड सोबतचा व्हिडीओ बघितला का?

आमिर खानची मुलगी इराचा बॉयफ्रेंड सोबतचा व्हिडीओ बघितला का?

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या बॉयफ्रेंडसोबत सध्या चांगलीच खूश असल्याची दिसून येत आहे. तिने बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ इंन्सटाग्रामवर शेअर केला आहे.

इराने एका मुलाखतीत आपल्या रिलेशनशिपवर मुक्तपणे संवाद साधला. इरा गेल्या बऱ्याच काळापासून मिशाल कृपलानीला डेट करत आहे. इरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिशाल कृपलानीसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. या फोटोंमुळे दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मिशालसोबतचे रिलेशनबाबत खुलासा केला.


मी माझे रिलेशनशिप स्टेटस कधीच लपवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून आहात त्यांच्याबाबत जाहिरपणे बोलायला अनेक जण घाबरतात. परंतु मी तशी नाही. मी मिशालसोबतचे फोटो बिनधास्त पोस्ट करते. कारण मला ते करायला आवडते. असंही इराने सांगितले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments