Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनदेवोलिनाची बिग बॉसमध्ये पुन्हा एंन्ट्री

देवोलिनाची बिग बॉसमध्ये पुन्हा एंन्ट्री

‘बिग बॉस 13’ सध्या भांडणामुळे चर्चेत आला आहे. सलमान खान होस्ट असलेल्या या शोमध्ये दररोज ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मात्र, कन्टेस्टंट देवोलिना भट्टाचार्जीला प्रकृतीच्या कारणामधून बाहेर शोमधून बाहेर यावे लागले आहे. उपचारानंतर पु्न्हा बीग बॉसच्या घरात एंन्ट्री होणार आहे.

देवोलिना काही दिवसांपासून आजारी आहे. ज्यामुळे ती शोचे टास्क आणि घरातील कामांमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. या कारणामुळे देवोलिना काही दिवसांसाठी घरातून बाहेर आली आहे. ती शोमधून बाहेर झालेली नाही आणि ठीक झाल्यानंतर ती पुन्हा शोमध्ये परत येणार आहे. सध्या बाहेर येऊन देवोलिना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेली आहे. उपचार घेत आहे. तिची 2017 मध्ये एक बॅक सर्जरीदेखील झालेली आहे.

देवोलिना बाहेर गेल्यामुळे मेकर्सने घोषणा केली आहे की, या आठवड्यात घरातून कुणीही एलिमिनेट होणार नाही. देवोलिनाचे शोमधे रश्मी देसाईसोबत चांगले बॉन्डिंग दिसते. दोघी आधीपासूनच खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. रश्मी घरात देवोलिनाची खूप काळजी घेताना दिसत होती. मागच्या आठवड्यात जेव्हा सलमानने असेच म्हणाले होते की, आरती सिंह आणि देवोलिना शोमधून बाहेर झाल्या आहेत तर रश्मी चक्क रडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments