Placeholder canvas
Monday, April 22, 2024
Homeमनोरंजनदीपिकाच्या डुप्लिकेटला; जिवे मारण्याची दिली धमकी!

दीपिकाच्या डुप्लिकेटला; जिवे मारण्याची दिली धमकी!

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल २६ वर्षांची झाली आहे. २६ ऑक्टोबर १९९१ मध्ये एर्नाकुलम (केरळ) मध्ये जन्मलेल्या अमाला पॉल हिला बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिची डुप्लिकेट म्हटले जाते. बऱ्याचवेळा दोघींच्या लूकमध्ये बऱ्याच अंशी साम्य आढळले आहेत. सोशल मीडियावरही नेहमीच दोघींच्या लूकविषयी चर्चा रंगत असते. फिल्मफेअर मॅगझिनसाठी दिलेल्या एका मुलाखतीत अमालाने सांगितले होते की, ‘हे माझ्यासाठी खूपच सन्मानजनक आहे की, लोक मला दीपिकाशी कम्पेअर करतात. परंतु मला असे वाटते की, ती माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहे.

अमालाच्या मते, ‘एकदा तिला अनोळखी कॉलरने फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. या व्यतिरिक्त चेन्नईमधील एका सिनेमा हॉलच्या बाहेरदेखील तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वास्तविक दिग्दर्शक सामी यांच्या ‘सिंधू समवेली’ या तामिळ कल्चरवर आधारित चित्रपटात काम करण्यावरून अमालाला बºयाचदा मोबाइलवर जिवे मारण्याची धमकी देण्यारे फोन आले आहेत. या चित्रपटात अमालाचा तिच्या सासºयावर जीव जडतो. पुढे त्यांचे अफेअर होत असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले होते.
२०११ दरम्यान ‘देइवा थिरूमगल’ या चित्रपटात काम करताना अमाला आणि दिग्दर्शक ए. एल. विजय यांच्यात जवळिकता निर्माण झाली. मात्र दोघांनीही सुरुवातीला रिलेशनशिपच्या बातम्या फेटाळल्या होत्या. मात्र २६ एप्रिल २०१४ रोजी अमाला पाल हिने रिलेशनशिपच्या बातम्या मान्य केल्या. पुढे ७ जून २०१४ मध्ये दोघांनी कोची येथे साखरपुडा केला. त्याच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच १२ जून २०१४ मध्ये दोघेही चेन्नई येथे विवाहाच्या बंधनात अडकले. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. पुढे जुलै २०१६ मध्ये दोघेही विभक्त झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments