Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनतिची कार पाहून दीपिकाने सोडला जिमचा नाद?

तिची कार पाहून दीपिकाने सोडला जिमचा नाद?

deepika padukone

बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल नेहमी काही ना काहीतरी गॉसिपिंग होत असते. सध्या चर्चा आहे ती कॅटरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यातील नात्याची. दोघींच्यामध्ये कोणतेही व्यावसायिक भांडण नसले तरी त्या एकमेकींसमोर मोकळेपणाने वावरत नाहीत. अर्थात त्याचे कारण आहे दोघींचाही एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर.

रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप झाले आणि तिच्याजागी कॅटरिनाने एन्ट्री घेतली. ही गोष्ट दीपिकाला खटकली असावी. सार्वजनिक कार्यक्रमात प्रसंगी त्या एकत्र दिसतीलही पण मनापासून त्या एकमेकींना टाळतात. त्याचे एक उदाहरण अलिकडेच घडले. दीपिका आणि कॅटरिना दोघीही यासिन कराचीवाला यांच्या जिममध्ये वर्कआऊट करतात. पण दोघींच्याही वेळा वेगवेगळ्या असतात. जेव्हा त्यांना जीमला जायचे असते तेव्हा त्यांचा मॅनेजर जिममध्ये फोन करुन चौकशी करतो आणि मगच त्या पोहोचतात. पण अलिकडे घडलेल्या घटनेत ही वेळ चुकली. दीपिका जिममध्ये पोहोचली आणि तिला पार्किंगमध्ये कॅटरिनाचे कार दिसली. ती जिममध्ये आहे म्हटल्यावर दीपिकाची जिममध्ये जायची हिंमतच झाली नाही. तिने यूटर्न घेतला आणि आपला जिमचा विचार सोडून दिल्याचे सूत्राकडून समजले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments