Thursday, September 12, 2024
Homeमनोरंजन‘परशा’आकाश ठोसरला लागली बॉलिवूडची लॉटरी!

‘परशा’आकाश ठोसरला लागली बॉलिवूडची लॉटरी!

‘सैराट’ या अभूतपूर्व यश मिळवणा-या चित्रपटामुळे आर्ची अर्थात रिंकु राजगुरू जितकी लोकप्रीय झाली. तितकाच परशा  उर्फ आकाश ठोसरही लोकप्रीय झाला. ‘सैराट’मुळे आर्ची व परशा हे दोघेही घराघरात पोहोचलेत. ‘सैराट’नंतर आकाशला लगेच महेश मांजरेकर यांच्या ‘एफ यू’ या चित्रपटाची लॉटरी लागली. अर्थात ‘एफ यू’ला ‘सैराट’ इतके अफाट यश मिळवता आले नाही. पण या चित्रपटातील आकाशच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली होती. प्रशंसा आणि प्रेम या बळावर आकाश आता बॉलिवूडमध्ये पर्दापण करत असल्याची खबर आहे. होय, आकाश ठोसलाला बॉलिवूडपटाची लॉटरी लागली आहे. विशेष म्हणजे, या बॉलिवूडपटात तो मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिच्यासोबत झळकणार असल्याचे कळतेय.

गत आठवड्यातच या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्याचीही खबर आहे. राधिकाच्या मित्राची भूमिका आकाश यात साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात चार लघुकथा आहेत. चार वेगवेगळे दिग्दर्शक या लघुकथा दिग्दर्शित करताना दिसणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी आकाश व राधिकाच्या कथेचे दिग्दर्शन केले आहे. आणखी एक इंटरेस्टिंग बातमी द्यायची झाल्यास, राधिका आपटे हिनेच तिच्या व आकाशच्या या कथेची स्क्रिप्ट लिहिली आहे.  रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांची निर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटातील अन्य तीन  कथांपैकी एक कथा झोया अख्तरने दिग्दिर्शित केली आहे. या भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. दर अन्य एक कथा दिवाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केली आहे. अभिनेत्री मनिषा कोईराला  एका आगळ्या-वेगळ्या रूपात या कथेत पाहायला मिळणार आहे. तूर्तास सांगायचे तर या चित्रपटातील राधिका अन् आकाशच्या कथेकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. कारण परशाला बॉलिवूडपटात पाहण्यास प्रेक्षक आतूर आहेत.    अनेक चित्रपट केल्यानंतरही कलाकारांना जी लोकप्रियता मिळत नाही, ती लोकप्रियता आकाशला ‘सैराट’ या एका चित्रपटाने मिळवून दिली. आता बॉलिवूडमध्ये आकाशला किती यश मिळतं, ते बघूच.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments