Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनटायगर श्रॉफ व दिशा पटनीच्या ‘लव्ह लाईफ’मध्ये वादळ?

टायगर श्रॉफ व दिशा पटनीच्या ‘लव्ह लाईफ’मध्ये वादळ?

Tiger Shrof-Disha Pataniटायगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटनी सध्या ‘बागी2’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच टायगर व दिशा हे रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहेत. पण सध्या तरी एक वेगळीच बातमी कानावर येतेय. होय, ‘बागी2’ रिलीज होण्याआधीच, या चित्रपटावरून दिशा व टायगर यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे. ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा ‘बागी2’च्या प्रमोशनमुळे नाराज आहे आणि ही नाराजी दिशा व टायगर यांच्या भांडणातून व्यक्त होऊ लागलीय.

‘बागी2’च्या प्रमोशनदरम्यान हे लव्ह बर्ड्स अनेकदा भांडताना दिसून आले आहेत. प्रमोशनदरम्यान सगळा फोकस टायगरवर असतो, ही बाब म्हणे दिशाला जाम खटकू लागलीय. केवळ इतकेच नाही तर एक ट्रेन्ड डान्सर असताना चित्रपटात तिचा एकही सोलो ट्रॅक नाही, हेही दिशाला खलू लागले आहे. हेच दिशाच्या नाराजीचे कारण आहे. निश्चितपणे सगळ्यांनाच हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला आहे. दिशा व टायगर दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत असल्याचे मानले जात आहे. दोघांनी अद्यापही आपले नाते कबुल केलेले नाही. पण म्हणून हे नाते लोकांपासून लपूनही राहिलेले नाही. टायगर व दिशा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत. मध्यंतरी दिशा व टायगरबद्दल वेगळीच चर्चा होती. या चर्चेनुसार, दिशा म्हणे टायगरला जराही भटकू द्यायला तयार नाहीय. टायगर कुठे जातो, काय करतो, यावर ती बारीक नजर ठेवून असते.  टायगरने त्याच्या फिमेल को-स्टार्सशी मैत्री करणे तर दूरच पण त्यांच्याशी बोलणेही दिशाला आवडत नाही. केवळ इतकेच नाही तर दिशाने टायगरसाठी अनेक नियम बनवले आहेत. शूटींगनंतर फिमेल को-स्टारसोबत बोलायचे नाही. दुसºया अभिनेत्रीसोबतचे स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे नाही. कुण्या मुलीच्या पोस्टला लाईक करायचे नाही. आता खरे काय नि खोटे काय, हे दिशा व टायगरलाचं माहित. आम्हाला केवळ एकचं माहितीयं की, या बातम्यात जराही तथ्य असेल तर ते दिशा व टायगरच्या लव्ह लाईफसाठी अजिबात ठीक नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments