Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनसलमानचा ‘रेस ३’ भारतातच

सलमानचा ‘रेस ३’ भारतातच

race3सलमान खान काळवीट प्रकरणात काही अडचणी असल्यामुळे विदेशात जाऊ शकत नाही. रेस ३ चे चित्रीकरण हे विदेशात होणार होते परंतु आता हे चित्रीकरण सलमानला देशातच करावे लागणार आहे. कोणत्या ठिकाणी चित्रीकरण करायचे आहे ते निर्मात्यांना निवडावे लागणार आहे. सलमान हे ठिकाण स्वत: निवडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काळवीट शिकार प्रकरणात सध्याचं वातावरण पाहता सलमान देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रीकरणाच्या वेळापत्रकात काही महत्त्वाचे बदल होणार आहे. ‘रेस ३’ या चित्रपटाच्या महत्त्वाच्या भागाचं चित्रीकरण परदेशात करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. पण, आता मात्र चित्रीकरणासाठी भारतातच नव्या ठिकाणाची निवड करण्यात येणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता सलमानची ही रेस भारतातच होणार असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता या ‘रेस’साठी नेमकी कोणत्या ठिकाणाची निवड केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सलमानच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘रेस ३’ विषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सलमान व्यतिरिक्त बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेझी शाह, साकिब सलीम हे कलाकारही झळकणार आहेत. मात्र देशात कोणत्या भागात रेस ३ चे चित्रीकरण होणार आहे याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments