Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनएका बी-ग्रेड चित्रपटाने या अभिनेत्रीचे करीअर केले उध्वस्त

एका बी-ग्रेड चित्रपटाने या अभिनेत्रीचे करीअर केले उध्वस्त

Asha Sachdevसत्तरच्या दशकातील सुंदर अॅक्ट्रेसेसपैकी एक असलेल्या आशा सचदेवने त्या काळातील प्रत्येक प्रसिद्ध अॅक्टर आणि डायरेक्टर बरोबर काम केले होते. एगदी महेश भट्ट यांनाही तिच्याबरोबर काम करायचे होते. पण फक्त एका बी ग्रेड चित्रपटात काम केल्यामुळे आशाच्या चांगल्याप्रकारे सुरू असलेल्या करिअरला उतरती कळा लागली होती. त्यानंतर तिला काम मिळणे बंद झाले. अगदी जे डायरेक्टर तिला ओळखत होते, त्यांनीही आशाबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

नेमके काय झाले होते..
१९७२ मध्ये आशाने बिंदिया और बंदूकया लो बजट बी-ग्रेड चित्रपटात काम केले होते. त्यात तिच्याबरोबर किरण कुमार, हेलन, रजा मुराद, केस्टो मुखर्जी आणि जोगिंदर शैली सारखे कलाकार होते.
चित्रपटात आशाच्या अॅक्टींगचे कौतुक झाले, पण करिअरच्या सुरुवातीलाच बी ग्रेड चित्रपटात काम केल्याने ए-लिस्ट डायरेक्टर्समध्ये तिची नकारात्मक प्रतिमा तयार झाली.
त्यानंतर कोणत्याही मोठ्या डायरेक्टरने तिच्याबरोबर काम केले नाही. अनेक मोठे चित्रपट तिच्या हातून निसटले. त्यामुळे नाईलाजाने तिला कमी बजेट असलेल्या चित्रपटात काम करावे लागले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments