Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनकरण सिंह ग्रोव्हर, बिपाशा बासूची छोट्या पडद्यावर‘वापसी’!!

करण सिंह ग्रोव्हर, बिपाशा बासूची छोट्या पडद्यावर‘वापसी’!!

Bipasha and Karan

‘अलोन’ या चित्रपटानंतर अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा हॅण्डसम हबी करण सिंह ग्रोव्हर यांच्या हाताला काम नव्हते. खरे तर लग्नाआधी बिपाशाची बॉलिवूडमध्ये नाही म्हणायला ब-यापैकी चलती होती. पण लग्नानंतर अचानक बिपाशा मागे पडली.

काहींच्या मते, लग्नानंतर काही  निर्माते – दिग्दर्शक बिपाशाकडे आॅफर घेऊन गेलेत. पण बिपाशाने म्हणे, स्वत:सोबत हबी करणलाही कास्ट करावे, अशी अट त्यांच्यापुढे ठेवली. मग काय, बिपाशाही नको अन् करणही नको म्हणून पुढे बिप्सला ऑफर्स मिळणेचं बंद झाले. तेव्हापासून बिप्स व करण दोघांकडेही काम नव्हते. पण आता या ‘मंकी लव्हर्स’ला (बिप्स व करणला ‘मंकी लव्हर्स’ म्हणून ओळखले जाते.) एक प्रोजेक्ट मिळालाय. होय, एका टीव्ही शोमधून बिप्स व करण दोघेही अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत वापसी करणार आहेत. कलर्सवरील ‘एंटरटेनमेंट की रात – द एक्सटेंशन’मध्ये बिपाशा व करण यांची वर्णी लागली आहे. स्वत: बिपाशाने याचा खुलासा केला. बिपाशाने दिलेल्या माहितीनुसार,  हा शो ‘एंटरटेनमेंट की रात’चे ‘एक्सटेंशन’ आहे. अद्याप याचे नाव ठरलेले नाही. येत्या एप्रिलमध्ये या शोचे प्रसारण होणार आहे.
३० एप्रिल २०१६ रोजी करण व बिपाशा दोघेही लग्नबंधनात अडकले होते. सन २०१४ मध्ये ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा व करण यांचे प्रेम फुलले होते. मध्यंतरी बिपाशा प्रेग्नंट असल्याची चर्चा पसरली होती. पण असे काही नसल्याचा खुलासा बिप्सने केला होता. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून बिपाशाने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला ‘राज’ हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत तिला नामांकन मिळाले होते. त्यानंतर २००५ मध्ये आलेला ‘नो एन्ट्री’ हा सिनेमासुद्धा हिट ठरला होता. बिपाशाने आत्तापर्यंत जवळजवळ ५५ सिनेमांमध्ये अभिनय केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments