Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनमहिला दिनाच्या शुभेच्छा देताना अमिताभ यांना सून ऐश्वर्याचा पडला विसर!

महिला दिनाच्या शुभेच्छा देताना अमिताभ यांना सून ऐश्वर्याचा पडला विसर!

SR Bachhan wish womens day

आज जगभर महिला दिन उत्साहात साजरा होतोय. बॉलिवूडही यात मागे नाहीत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. पण या ट्विटनंतर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. होय, या ट्विटमध्ये अमिताभ यांनी पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, दोन्ही नाती नव्या नवेली आणि आराध्या बच्चन या सगळ्यांचे फोटो शेअर केले आहेत. पण कुटुंबातील एका महिलेला मात्र अमिताभ विसरले आहेत. होय, या फोटोंत अमिताभ यांची सून ऐश्वर्या राय बच्चन कुठेही नाही. साहजिकचं ऐश्वर्या का नाही? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. चाहत्यांनाही हा प्रश्न पडलाय. केवळ इतकेच नाही यावरून वेगवेगळे तर्क लढवणेही सुरु झाले आहे. तुमच्या फोटोत ऐश्वर्या मिसींग आहे सर, याकडे  चाहत्यांनी अमिताभ यांचे लक्ष वेधले.

आता अमिताभ यांनी ऐश्वर्याचा फोटो शेअर करणे का टाळले? हे आम्हाला माहित नाही. त्यांनी जाणीवपूर्वक टाळले की, त्यांच्याकडून अजानतेपणी हे घडले, हेही आम्हाला ठाऊक नाही. पण चाहत्यांनी  आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आता ही नाराजी दूर करण्यासाठी अमिताभ काय करतात, ते बघूच.
बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कुटुंब आहे. साहजिक या कुटुंबात खट् झाले तरी त्याची बातमी होते. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दल अनेक चर्चा मीडियात येत आहेत.  ऐश्वर्याचे सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन हिच्यासोबत बिघडलेले नात्याची चर्चा सध्या जोरात आहे.  विशेषत: ऐश्वर्या व श्वेता या दोघींमध्ये सगळे काही आॅल वेल नाही, याचे अनेक अप्रत्यक्ष पुरावे मिळत आहे. अलीकडे ऐश्वर्याने अभिनेत्री व दिग्दर्शिका फराह खान हिची बर्थ डे पार्टी मिस केली होती, यामागेही श्वेता बच्चन हेच कारण सांगितले गेले होते.  श्वेता या पार्टीला येणार असल्याचे कळल्यानेच ऐश्वर्याने या पाटीर्ला दांडी मारल्याचे यावेळी म्हटले गेले होते.  त्यापूर्वी अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या रिसेप्शन पार्टीतही ऐश्वर्या व श्वेता एकमेकींना इग्नोर करताना दिसल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments