Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशसोनिया गांधी लिलावती रुग्णालयात पंतगराव कदमांची भेट घेणार?

सोनिया गांधी लिलावती रुग्णालयात पंतगराव कदमांची भेट घेणार?

Sonia Gandhi,congressमुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची विचारपुस करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या लिलावती रुग्णालयात येणार आहेत.

कदम यांना शनिवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून कदम यांच्यावर उपचार सुरू आहेत. किडनीच्या विकाराने ग्रस्त असलेल्या कदम यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे.  रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, सोमवारी त्यांना अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले आहे.
पतंगराव कदम यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर कदम यांची प्रकृती बिघडल्याच्या उलट-सुलट पोस्ट व्हायरल होत होत्या. या सर्व प्रकारामुळे पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांसह हितचिंतकांमध्ये देखील अस्वस्थता पसरली होती. परंतु, त्यानंतर विश्वजित कदम यांनी कदम साहेबांची प्रकृती उत्तम असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केल्यानंतर अफवांना पूर्णविराम मिळाला होता. त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते हितचिंतकांची गर्दी वाढत चालली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments