Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनमहानायक अमिताभ बच्चन यांना 'दादासाहेब फाळके' पुरस्कार

महानायक अमिताभ बच्चन यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार

बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना यंदाचा “दादासाहेब फाळके” पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वानुमते अमिताभ बच्चन यांच्या नावाची घोषणा झाली आहे. सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली.

जावडेकर यांनी ट्वीटमध्ये लिहीले की, ‘महानायक अमिताभ बच्चन, ज्यांनी 2 पिढ्यांसाठी मनोरंजन आणि प्रेरणा दिली आहे, त्यांची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाली आहे. संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय खूप आनंदीत आहे. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.”

अमिताभ यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय त्यांना 14 वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

काय आहे दादासाहेब फाळके पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये अतुलनिय कामगिरी करणार्‍या कलावंत आणि तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1969 मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयात ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments