Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रखासदार सुप्रिया सुळेंना डेंग्यूची लागण

खासदार सुप्रिया सुळेंना डेंग्यूची लागण

मुंबई : सध्या विधानसभा निवडणुकीचा हंगाम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाली आहे. स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर याबाबत माहिती दिली. प्रचारात सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी सज्ज असताना डेंग्यूची लागण झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यामुळे कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला! मला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.”

सुप्रिया सुळे महिला संघटनासोबतच राज्यात अनेक विषयांवर त्यांनी नेतृत्व केलं आहे. मुंबई मेट्रो कारशेडच्या विषयातही त्यांनी ठोस भूमिका घेतली. त्या स्वतः ‘आरे’ मधील वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जालन्यातील निर्भयावर मुंबईत झालेल्या बलात्काराच्या प्रकरणावरही सुप्रिया सुळेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच राज्यातील महिला अत्याचाराच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेत गुंग आहेत. त्यांनी जालन्यात असून या बलात्कार पीडितेविषयी एक शब्दही काढला नाही, अशी घणाघाती टीका त्यावेळी सुप्रिया सुळेंनी केली होती.मात्र सुप्रिया सुळेंच्या बेडरेस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणात फटका बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments