Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनसोनम कपूरनंतर दीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या घरात वाजणार सनई-चौघडे

सोनम कपूरनंतर दीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या घरात वाजणार सनई-चौघडे

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नानंतर बी-टाऊनमध्ये सगळ्यात जास्त जर कोणाच्या लग्नाची चर्चा असेल तर ती दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची. रिपोर्टनुसार दोघे यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात लग्न करण्याची शक्यता आहे. तर मुंबई मिररच्या रिपोर्ट बंगळुरु आणि मुंबईतल्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दोघे लग्नाचा दिवस खास बनवण्यासाठी  इंटरनॅशनल डेस्टिनेश वेडिंग करणार आहेत.

दोघे ही सध्या डेस्टिनेश वेडिंगसाठी जागेची निवड करत आहेत. लग्नासाठी वेडिंग प्लॉनरची निवड सुद्धा करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिका आणि रणवीर लग्नाला काही मोजक्याच जवळच्या लोकांना लग्नासाठी आमंत्रण देणार आहेत. दोघे शाही लग्न करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने दिलेल्या एक मुलाखतीत म्हटले की, लग्न माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. मी माझ्या पालकांना पाहिले आहे आणि मलाही त्यांच्याप्रमाणे आयुष्य हवे आहे. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मला याची जाणीव होईल आणि माझे लग्न व्हायचे असेल तेव्हा होईल. पुढे बोलताना दीपिकाने म्हटले की, मी कामापासून दूर निघून जाईन, हे माझ्यासाठी खूप कठीण असेल. मला असे वाटते की, घर, परिवार, आई-वडील आणि लग्न माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
‘पद्मावत’नंतर दीपिका विशाल भारद्वाज यांच्या ‘सपना दीदी’ या चित्रपटात दिसणार आहे. यात दीपिकाच्या अपोझिट इरफान खानचे नाव फायनल झाले होते. पण या चित्रपटाचे शूटींग सुरू होण्याआधीच इरफानच्या आजाराची बातमी आली. न्युरो इंडोक्राईन ट्युमर या दुर्धर आजाराने इरफानला ग्रासले आहे. सध्या विदेशात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ‘सपना दीदी’चे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments