‘बिग बॉस-11’मध्ये एकानंतर एक कॉन्ट्रव्हर्सी समोर येत आहे. एकीकडे कंटेस्टंट एकमेकांची पर्सनल लाइफ सर्वांसमोर उघड करण्यात मागेपुढे पाहात नाही, तर दुसरीकडे बाहेरच्या लोकांबद्दल काहीही बोलून त्यांची खिल्ली उडवत आहेत. ‘भाभीजी घर पर है’ची अंगुरी भाभी अर्थात टीव्ही अॅक्ट्रेस शिल्पा शिंदेने साऊथच्या फिल्म चालू असतात असे म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांना चोर देखील म्हटले आहे.
एका ट्विटर यूजरने त्याच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये शिल्पा इतर कंटेस्टंटसोबत बोलत असते. ती साऊथच्या फिल्मबद्दल बोलायला लागते. ती सांगते, की एका फिल्ममध्ये तिला व्हाइट साडीमध्ये पाण्यात उतरवले होते, ते एक गाणे शुट करत होते. त्यानंतर शिल्पा म्हणाली, साऊथच्या फिल्म एवढ्या चालू आणि चोर असतात… विशेष म्हणजे, बिग बॉसमधून साऊथच्या फिल्मवर हा दुसरा टोमणा होता. याआधी हिना खानने साऊथच्या अॅक्ट्रेसेसची खिल्ली उडवली होती. त्या कशा जाड्या आणि थुलथुलीत पोटाच्या असतात असे, म्हटले होते.