Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनकमाल खानला पोटाचा कॅन्‍सर!

कमाल खानला पोटाचा कॅन्‍सर!

KRKमुंबई:बॉलिवूड अभिनेता इरफान खान कॅन्‍सरने पीडित असल्‍याची सर्वांना माहिती आहे. आता आणखी एका अभिनेत्‍याबाबत वाईट बातमी समजली आहे. ती म्‍हणजे कमाल खान लादेखील कॅन्‍सर आहे. कमाल खानला पोटाचा कॅन्‍सर असून तो थर्ड स्‍टेजला असल्‍याचे त्‍याने स्‍वत: ट्‍विट करून सांगितलं आहे. भावूक असे ट्‍विट करत आपण आता काही वर्षच जगणार असल्‍याचे त्‍याने म्‍हटले आहे. 

अभिनेता कमाल राशिद खान नेहमीच आगळ्‍या-वेगळ्‍या ट्‍विटमुळे चर्चेत राहिला आहे. आता त्‍याने एक ट्‍विट करून त्‍याच्‍या गंभीर आजाराबद्‍दल सांगितले. ‘कदाचित मी आणखी दोनच वर्ष या जगात राहू शकेन,’ असं त्‍यानं म्‍हटलं आहे. गेल्‍या काही काळापासून कमाल खान हा टीव्‍ही शो आणि चित्रपट दुनियेपासून दूर आहे. त्‍याने अचानक ही बातमी उघड केली आहे. पत्रकार परिषद घेऊनही त्‍याने ही माहिती दिली आहे. ‘हे कन्‍फर्म आहे की, मला पोटाचा कॅन्‍सर आहे. आणि मी तिसर्‍या स्‍टेजला आहे. कदाचित मी दोनच वर्षे जगेन. आता मी दुसर्‍यांसाठी एंटरटेनमेंट करू शकत नाही,’ असे कमाल खानने सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments