Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनदीपिकाचे शीर कापणा-यांना १० कोटींचे बक्षीस, ट्विंकलने विचारले GST लागणार का?

दीपिकाचे शीर कापणा-यांना १० कोटींचे बक्षीस, ट्विंकलने विचारले GST लागणार का?

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीचित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढता विरोध बघता निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. या चित्रपटाच्या कथानकामुळे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दीपिकाचे नाक कापण्याची धमकी दिली होती. त्यामागोमागच अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही दीपिकाला धमकावले. तिला जिवंत जाळणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. आता हरियाणा बीजेपीचे चीफ मीडिया को-ऑर्डिनेटर कुंवर सूरजपाल अमू यांनी दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांचे शीर कापणा-यांना १० कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. यावरुन बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने अमू यांना टोला लगावला आहे.

अमूच्या घोषणेनंतर ट्विंकल खन्नाने लगावला त्यांना टोला…
अमूच्या या घोषणेनंतर ट्विंकल खन्नाने ट्वीट केले. “या १० कोटींच्या बक्षिसावर जीएसटी लागणार की नाही? हे देशाला जाणून घ्यायचे आहे,” असा टोला तिने लगावला आहे. ट्विंकलच्या या ट्वीटला तीन हजारांहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आले आहे. यूजर्सनीसुद्धा अमूची खिल्ली उडवली आहे.

ट्विंकलचा भन्साळींना पाठिंबा…
ट्विंकल खन्नाने भन्साळींना पाठिंबा दर्शवणारे आणखी एक ट्वीट केले आहे. पद्मावती सर्वात मोठा हिट चित्रपट ठरावा, अशी मी आशा करते. हेच धमकी देणा-या लोकांना सडेतोड उत्तर ठरेल, अशा आशयाचे ट्वीट ट्विंकलने केले आहे.

अखिल भारतीय क्षत्रिय महासेभेनेही दिली दीपिकाला जीवे मारण्याची धमकी…
‘जर कोणी दीपिकाचेच जौहर केले तर त्या व्यक्तीला एक कोटींचे बक्षीस देण्यात येईल’, असे अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंह यांनी जाहीर केले. ‘ज्यावेळी राणी पद्मावतीने राजवंशाच्या हितार्थ जौहर केला होता, त्यावेळी तिच्या मनात नेमक्या कोणत्या भावना होत्या याची जाणीव दीपिकाला व्हावी’, असा इशारा त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments