Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनसोनम कपूर अडकणार लग्नाच्याबेडीत?

सोनम कपूर अडकणार लग्नाच्याबेडीत?

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोनम कपूरने त्यावेळी या गोष्टी केवळ अफवा असल्याचे म्हणते आपण सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले होते. मात्र एका रिपोर्टनुसार दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे कळतेय.

नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार सोनम कपूर आणि आनंद अहुजा यावर्षी जूनमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या दोघांचे काही खासगी कार्यक्रम आहेत. याशिवाय लग्नाच्या आधी दोघे साखरपुडा देखील करणार आहेत. सोनमचा भाऊ हर्षवर्धन कपूरची होणाऱ्या जीजूबरोबर चांगली मैत्रीदेखील झाली आहे. आनंदसुद्धा सोनम कपूरच्या कुटुंबीयांमध्ये बऱ्यापैकी रुळला आहे.
मिळालेले माहितीनुसार दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. लग्न संपूर्ण पंजाबी पद्धतीने होणार आहे. सोनम आणि आनंदच्या लग्नासाठी जवळपास ३०० पाहुण्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे. सोनम आणि आनंद जवळपास 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनी आपलं नातं अधिकृतरित्या कधी स्वीकरले नाही आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे.  त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न  सुमारे २८ अरब इतके आहे.
लवकरच सोनम कपूर पॅडमन चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि राधिका आपटे सुद्धा दिसणार आहेत.  पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments