Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनरणवीर-दीपिकाचा नवा बंगला?

रणवीर-दीपिकाचा नवा बंगला?

बॉलिवूडमधील जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच मालदीव येथे आपल्या कुटुंबांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेऊन भारतात परतले. या ट्रीपदरम्यान रणवीर दीपिकाने साखरपुडा केल्याचेही वृत्त होते. मात्र, रणवीरच्या प्रवक्त्याने त्यांच्या साखरपुड्याचे वृत्त फेटाळून लावले. इतकेच नव्हे तर रणवीरच्या पालकांनी दीपिकाला सब्यासाचीने डिझाइन केलेली साडी आणि डायमंड सेट वाढदिवसाची भेट म्हणून दिले. या वर्षात हे प्रेमीयुगुल लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

रणवीर आणि दीपिका त्यांच्या नात्याला नवे नाव देण्याच्या पूर्ण तयारीत असल्याचे चित्र सध्या आहे. त्यानुसार त्यांनी एकत्र गुंतवणूक करण्यासही सुरुवात केल्याचे दिसते. ‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनी मिळून गोव्यात एक बंगला विकत घेतला आहे. ‘कधीकधी मला गोव्यातच थांबावेसे वाटते. पण, मी मुंबईतच सर्वाधिक वेळ राहत असल्याने तेथेच चांगली आणि मोठी जागा घेण्यात अर्थ आहे. त्यामुळे कदाचित मी गोव्याला जाऊ शकणार नाही, असे रणवीर एकदा एका मुलाखतीदरम्यान म्हणाला होता.

गोव्यातील उच्चभ्रू भागात रणवीर – दीपिकाने बंगला घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे त्यांच्या बंगल्याच्या शेजारी रघुराम राजन आणि सुनिल गावस्कर यांची घरे आहेत. मात्र, एका वृत्तपत्राने रणवीरच्या टीमशी याविषयी संवाद साधला असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. पण, आगीशिवाय धूर निघत नाही असे म्हणतात. दीपिकाने ‘फाइंडिग फॅनी’चे चित्रीकरण गोव्यातच केले होते. या चित्रपटात रणवीरने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर दोघांनी तेथे पार्टीही केलेली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रणवीरने दीपिका राहत असलेल्या इमारतीत एक नवे अपार्टमेण्ट विकत घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments