Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमनोरंजनझीनत अमान यांनी का घेतली पोलिसात धाव!

झीनत अमान यांनी का घेतली पोलिसात धाव!

एकेकाळची गाजलेली अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईच्या एका व्यावसायिकाविरोधात फसवणूक आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. झीनत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली.

झीनत यांनी काल संध्याकाळी जुहू ठाण्यात सरफराज उर्फ अमन खन्ना नामक व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केली. सरफराज आपल्या घरी आला आणि त्याने सुरक्षारक्षकाला मारहाण करीत आपल्यालाही गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी दिली, असे झीनत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सरफराज गेल्या काही दिवसांपासून आपल्या व्हाट्सअ‍ॅपवर अश्लिल मॅसेज पाठवून असल्याचा आरोपही झीनत यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सरफराजविरूद्ध अनेक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराजविरोधात शारिरीक शोषणाचे प्रकरण नाही. त्याने अभिनेत्री झीनत यांच्यासोबत गैरवर्तन करून सोसायटीच्या गार्डला मारहाण केली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याकाळची अतिशय बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख मिळवणाºया  झीनत अमान यांनी ‘हरे कृष्णा हरे राम’, ’सत्यम शिवम सुंदरम’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
१९७० साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनत अमान यांनी लॉस एंजलिमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते़  यानंतर मॉडेलिंग क्षेत्रातून  आपल्या कारकिदीर्ची सुरुवात केली. १९७१ साली ओ.पी. राल्हन यांच्या ‘हलचल’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ८० च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या. त्यादरम्यानच्या काळात मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

ण आहे सरफराज
सरफराजची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे सांगण्यात येते. बांगूर नगर येथेही त्याच्याविरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. गुंडगिरी आणि विक्षिप्त गोष्टी करण्याची त्याची सवय आहे. तो चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याचेही म्हटले जाते. काही वर्षे तो चित्रपटसृष्टीत होता. मग त्याने रिअल इस्टेटमध्ये काम करणे सुरू केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments