Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनआईच्या निधनानंतर कामावर परतली जान्हवी कपूर!

आईच्या निधनानंतर कामावर परतली जान्हवी कपूर!

Janhvi Kapoorश्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंब हळूहळू सावरू लागले आहे. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर ही सुद्धा कामावर परतली आहे. गुरुवारी जान्हवी  ‘धडक’ या आपल्या डेब्यू सिनेमाच्या शूटवर परतली. सेटवर  शॉट देतानाचे तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत जान्हवी साडीत दिसते आहे. तिचा हा लूक पाहून तुम्हाला श्रीदेवीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. होय, कारण जान्हवीचा हा लूक  ‘इंग्लिश विंग्लिश’मधील श्रीदेवींच्या लूकशी बराच मिळता जुळता आहे.

Janhvi Kapoor‘धडक’ हा जान्हवीचा पहिला चित्रपट आहे.  येत्या जुलैमध्ये तिचा  हा  सिनेमा प्रदर्शित होतो आहे. श्रीदेवींनी या चित्रपटासाठी जान्हवीला खास तयार केले होते. जान्हवीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून डान्सिंग क्लासपर्यंत सगळ्यांवर श्रीदेवींची नजर असायची.

श्रीदेवी आपल्या दोन्ही मुलींच्या खूप जवळ होत्या. जान्हवीला तर तिने स्वत:ला डोळ्यापुढे ठेवून घडवले होते. शूटींगला जाण्यापासून तिच्या करिअरबद्दलचे सर्व निर्णय श्रीदेवी स्वत: घ्यायच्या. श्रीदेवीला एक मोठी स्टार म्हणून पाहणे, त्यांचे स्वप्न होते. मुलीचा डेब्यू सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी आतूर होत्या. पण त्यापूर्वीच श्रीदेवींना मृत्यूने गिळले.

जान्हवीच्या ग्रॅण्ड लॉन्चची जबाबदारी श्रीदेवींनी  करण जोहरवर टाकली होती. पण लेकीचे ह ग्रॅण्ड लॉन्चिंगही पाहणे श्रीदेवींच्या नशिबात नव्हते. पण जान्हवी मात्र आईचे अधूरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परतली आहे. आई तुला माझा अभिमान वाटेल, असेच मी आयुष्यात करेल, असे वचन जान्हवीने आपल्या वाढदिवशी आईला दिले आहे आणि हे वचन जान्हवी नक्की पूर्ण करेल, यात काहीही दुमत नाहीये. आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून आपल्या व्यावसायिक जबाबदाºया पूर्ण करण्याचा संमजसपणा जान्हवीने दाखवला, यातच सगळे काही आलेय.

गत २४ फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलात श्रीदेवींनी अंतिम श्वास घेतला. बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या.  हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. सुमारे अडीच दिवसांच्या चौकशीनंंतर दुबई पोलिसांनी पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवले होते. यानंतर २८ फेबु्रवारीला श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments