वयाच्या 15 व्या वर्षी बरीच मुले कार्टून आणि व्हिडिओ गेम खेळण्यात मशगूल असतात. मात्र, दुबईचा हा टीनेजर आलीशान आयुष्याच्या बाबतीत भल्या-भल्यांना लाजवतो. याच्या मित्रांच्या यादीत पप्या किंवा पिंट्या नाहीत, तर सलमान खान आणि शाहरुख खान आहेत. राशेद बेलहासा असे या मुलाचे नाव असून तो दुबईतील नामवंत उद्योजक सैफ अहमद बेलहासा यांचा मुलगा आहे. केवळ शूजबद्दल बोलावयाचे झाल्यास त्याच्याकडे 6.5 कोटी रुपयांचे शूज कलेक्शन आहे. प्रायव्हेट फार्म हाऊस, जेट आणि आलीशान कारच्या ताफ्याचा तो मालक आहे. दुबईला जाणारी कुठलाही भारतीय सिलेब्रिटी त्याची भेट घेतल्याशिवाय परत येत नाही.