टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात एवढे वाद झाले आहेत, की आता सलमान खानही या वादात अडकला आहे. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये सलमानने झुबेर खानला त्याच्या वर्तनुकीमुळे चांगलेच सुनावले होते. त्यानंतर झुबेरने आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच सलमानच्या विरोधात तक्रारही दाखल केली. पण एवढ्यावरच हा विषय थांबला नाही, दवाखान्यातून निघाल्यानंतर मीडियासमोर झुबेरने सलमानबाबत बरीच गरळ ओकली आहे.
झुबेरसह त्याच्या कुटुंबीयांनीही सलमानला खरी खोटी सुनावली आहे. झुबेरने तर सलमानला धमकीच दिली आहे. तू मला कुत्रा बनवणार ना मग कुठे भेटू सांग, फक्त बॉडीगार्डशिवाय समोर ये, अशा शब्दांत झुबेर सलमानवर घसरला आहे.