मुंबई– सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनेकांना तिने तिच्या अदांनी घायाळ केलंय. सनी लिओनीने हिंदी चित्रपटांत काम केलंच आहे, याशिवाय तमिळ, मराठी, कन्नड चित्रपटांमध्येही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली आहे. शिवाय तिची काही आयटम सॉंग गाजली आहेत. सनी लिओनीबद्दल अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती नाहीये. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूयात.
सनीचं पदार्पण खरंतर २००५ साली आलेल्या कलियुग चित्रपटातून होणार होतं. मात्र तिने या चित्रपटासाठी १० लाख रूपये मागितले होते, ज्यामुळे चित्रपट दिग्दर्शकाने तिला नकार दिला होता.
सनी प्रचंड वाचनप्रेमी आहे, तिला पार्टी करण्यापेक्षा पुस्तकं वाचणं आवडतं.
सनीला वाचनासोबतच खाण्याची देखील प्रचंड आवड.
डेनियल वेबर सोबत लग्न होण्याआधी तिचा मॅट एरिक्सन याच्याशी साखरपुडा झाला होता.
जगप्रसिध्द हास्यकलाकार रसेल पिटर सोबतही तिचे प्रेमसंबध होते.
बेबी डॉल ही खूप घाबरट असून तिला किडे, मुंग्यांची खूप भिती वाटते.
बॉलिवूडमध्ये येण्याआधी ती एका जर्मन बेकरीत काम करत होती.
तिच्या कोणत्याही चित्रपटाचे स्क्रिप्ट हे पहिले तिचा नवरा डेनियल वेबरने वाचतो, त्याने होकार दिल्यानंतरच सनी चित्रपट स्वीकारते.