Friday, June 21, 2024
Homeमनोरंजनसनी लिओनीची लेक ‘निशा’चा अमेरिकेत वाढदिवस साजरा !

सनी लिओनीची लेक ‘निशा’चा अमेरिकेत वाढदिवस साजरा !

अभिनेत्री सनी लिओनी आणि डेनियल वेबर या दाम्पत्याने गेल्या जुलै महिन्यात लातूर जिल्ह्यातील एका मुलीला दत्तक घेतले होते. या जोडप्याने तिचे नाव निशा कौर वेबर असे ठेवले. नुकताच सनी आणि डेनियलने आपल्या मुलीचा दुसरा वाढदिवस अमेरीकेत साजरा केला. या वाढदिवसाचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये निशा एखाद्या प्रिन्सेससारखी दिसत आहे. यावेळी निशा तिच्या मम्मी-पापासोबत पोझ देताना दिसून येते.
दरम्यान, आपल्या लाडकीचे अमेरिकेत वाढदिवस साजरा करणाºया या दाम्पत्याने त्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केले. फोटोमध्ये निशा खूपच आनंदी दिसत आहे. आपल्या लेकीचा वाढदिवस  साजरा करताना सनी आणि डेनियलच्या चेहºयावरील आनंद देखील बघावयास मिळत आहे. सनी आणि डेनियलच्या जीवनात निशा आल्याने या दोघांचे आयुष्यच बदलून गेल्याचे सनीने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.

सनीने जेव्हा निशाला दत्तक घेतले होते, तेव्हा ती २१ महिन्यांची होती. या मुलीविषयी अशी बातमी समोर आली होती की, सनीने निशाला दत्तक घेण्याअगोदर तब्बल ११ परिवारांनी नाकारले होते. मात्र अशातही सनीने निशाला दत्तक घेतले. वास्तविक निशाच्या सावळ्या रंगामुळे तिला नाकारले जात असल्याचा खुलासा चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स एजन्सीने केला होता. याविषयी एजन्सीचे सीईओ लेफ्टनंट कर्नल दीपककुमार यांनी सांगितले होते की, ‘बरेचसे दाम्पत्य बाळाचा रंग, चेहरा आणि त्याची मेडिकल हिस्ट्री जाणून घेण्याबाबत अधिक उत्सुक असतात. याच कारणामुळे निशाला काही दाम्पत्यांनी नाकारले होते.’

खरं तर सनीने निशाचे बॅकग्राउंड, तिचा रंग, मेडिकल हिस्ट्री याबाबतची फारशी चिंता न करता तिला दत्तक घेतले. तब्बल नऊ महिन्यांच्या प्रोसेसनंतर या दाम्पत्याने निशाला दत्तक घेतले. दरम्यान, सनी आणि डेनियल आपल्या चिमुकल्याच्या भविष्याविषयी अधिक सतर्क असून, तिला आयुष्यातील प्रत्येक आनंद देऊ इच्छितात. काही दिवसांपूर्वीच सनीने आपल्या मुलीने कुठल्या क्षेत्रात करिअर करायला हवे, याबाबतची इच्छा व्यक्त केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments