Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजनरितेश अमेयवर का रागावला?

रितेश अमेयवर का रागावला?

रीतेश देशमुखची निर्मिती, अमेय वाघची मुख्य भूमिका आणि चित्रपटाचं अनोखं प्रमोशन या सर्व कारणांमुळे ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. आधी मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले ‘फ’च्या बाराखडीचे व्हिडिओ आणि आता अमेयने फेसबुकवर पोस्ट केलेला एक फोटो नेटीझन्सचं लक्ष वेधत आहेत. हा फोटो पाहून रितेश अमेयवर का चिडला आहे असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

अमेयने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये चित्रपटाचा निर्माता रितेश देशमुख दिसत आहे. अमेयच्या एका बाजूला मोबाईलमध्ये रितेशचा फोटो पाहायला मिळत आहे तर त्याच्या दुसऱ्या बाजूला स्वत: रितेश उभा आहे. रितेश अमेयकडे रागाने बघत आहे. मोबाईलमधील फोटो नीट पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की त्यामधील रितेशचा लूक आणि अमेयचा लूक एकसारखाच आहे. दोघांची हेअरस्टाइलसुद्धा सारखीच आहे. रितेशचा हा लूक त्याने ‘फास्टर फेणे’साठी कॉपी केल्याचं दिसून येत आहे. आता रितेश त्याच्यावर नेमका कशामुळे रागवला आहे याचं कारण तो स्वत:च सांगू शकेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments